ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
वादळाच्या इशाऱ्यामुळे पर्यटन सप्ताहनिमित्त २८ सप्टेंबर रोजीची किल्ले सिंधुदुर्ग क्षेत्रभेट रद्द....!
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

वादळाच्या इशाऱ्यामुळे पर्यटन सप्ताहनिमित्त २८ सप्टेंबर रोजीची किल्ले सिंधुदुर्ग क्षेत्रभेट रद्द....!

वादळाच्या इशाऱ्यामुळे पर्यटन सप्ताहनिमित्त २८ सप्टेंबर रोजीची किल्ले सिंधुदुर्ग क्षेत्रभेट रद्द....!



कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे स. का. पाटील सिंधुदुर्ग कला व वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गव्हाणकर सायन्स कॉलेजच्या आयक्यूएसी आणि किल्ले प्रेरणोत्सव समिती, पर्यटन विकास व्यवसायिक महासंघ व युवा पर्यटन क्लब यांच्यावतीने प्रा. डाॅ. सुमेधा नाईक यांची माहिती.




मालवण : पर्यटन सप्ताह निमित्त, २८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेली किल्ले सिंधुदुर्ग क्षेत्रभेट रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे स. का. पाटील सिंधुदुर्ग कला व वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गव्हाणकर सायन्स कॉलेजच्या आयक्यूएसी आणि किल्ले प्रेरणोत्सव समिती, पर्यटन विकास व्यवसायिक महासंघ व युवा पर्यटन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने “पर्यटन सप्ताह २०२५ : किल्ले गौरवशाली भूतकाळ (Forts Glory of the Past)” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत.




या पार्श्वभूमीवर २८ सप्टेंबर २०२५ रोजी रविवारी सकाळी ८ वाजता सिंधुदुर्ग किल्ला क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी इतिहास विषयातील तज्ज्ञ डॉ. ज्योती बुवा तोरसकर मार्गदर्शन करणार होत्या.

महाविद्यालयातील मराठी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना तसेच आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांनी या क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते. 


प्रा डाॅ. सुमेधा नाईक यांच्या माहिती नुसार, आयोजकांच्या वतीने ही क्षेत्रभेट जेंव्हा पुन्हा आखली जाईल त्यासंबंधी माहिती दिली जाणार आहे परंतु तूर्तास 'वादळाचा इशारा' पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून २८ सप्टेंबर रोजीची क्षेत्रभेट रद्द करण्यात आली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स