मालवण नगरपरिषदच्या वतीने चिवला बीच येथे स्वच्छता मोहिम.
मालवण नगरपरिषदच्या वतीने चिवला बीच येथे स्वच्छता मोहिम.
मालवण | ब्यूरो न्यूज : गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार स्वच्छता ही सेवा पंधरवडा देशभर साजरा होत आहे. त्यानिमित्त मालवण नगरपरिषदच्या वतीने शनिवार, २० सप्टेंबर रोजी मालवण नगरपरिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. विनायक औंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिवला बीच मालवण येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले.
या मोहिमेस मालवण नगरपरिषद अधिकारी, सफाई कर्मचारी तसेच NCC, मत्स्य विभाग अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांनी प्रतिसाद देत स्वच्छता ही सेवा उपक्रम यशस्वी केला. या मोहिमेचा उद्देश स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच स्वच्छतेविषयीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे हा होता.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त समुद्र किनारा स्वच्छता मोहीम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.
मालवणात चिवला बीचवर स्वच्छता मोहिम.आरोग्य सभ...