ताज्या बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा. मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप. लज्जारक्षण. कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली उत्साहात. मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण. व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम. कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी. आरवली जीवन शिक्षण शाळा नं. १ येथे रानभाज्या महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद. जय भोसले यांचा बांद्यात 'दुहेरी'  सत्कार.
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा.
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Sidebar (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Single image - Above Title (Aug 9, 2026)
Image slider - Below Title (Aug 9, 2026)

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा.

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानची वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा. 


कणकवली | ब्यूरो न्यूज : वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी वामनदाजी शास्त्रोक्त गायन स्पर्धा घेण्यात येते. यावर्षीच्या स्पर्धेची प्राथमिक फेरीसाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर असून प्राथमिक फेरीचा निकाल २१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. स्पर्धकाला प्राथमिक फेरीमध्ये ऑनलाइन पद्धतीने सहभागी होता येणार असून कोणत्याही एका रागाची mp3 फाईल व्हाट्सअप वर पाठवावी. अंतिम फेरीत पात्र झालेल्या स्पर्धकांची स्पर्धा कणकवली येथे ७ नोव्हेंबर २०२५ रोजी संस्थेच्या नाट्यगृहात संपन्न होणार आहे.


या उपक्रमात पहिल्या दिवशी वामनदाजी शास्त्रीय गायन स्पर्धा, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी संगीत रसग्रहण कार्यशाळा आणि तिसऱ्या दिवशी सायंकाळी पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृति संगीत महोत्सव असे त्रिसूत्री उपक्रमाचे स्वरूप आहे. या उपक्रमात शास्त्रीय संगीतातील नामवंत व्यक्तींचा सहभाग असतो वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे गुरु पंडित, समीर दुबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन केले जाते. या महोत्सवातील वामनदाजी शास्त्रीय गायन स्पर्धा संस्थेने जाहीर केली असून प्राथमिक आणि अंतिम अशा दोन टप्प्यात ही स्पर्धा घेतली जाणार आहे.


या स्पर्धेत शास्त्रीय संगीताचा किमान ५ वर्षे अभ्यास केलेल्या स्पर्धकाला स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. अंतिम फेरी प्रथम पारितोषिक प्राप्त स्पर्धकाला या महोत्सवामध्ये आपले गाणे सादर करण्याची संधी मिळणार आहे. संगीत क्षेत्रातील नामवंत परीक्षक, उत्तम साथ संगीत करणारे वादक व पारदर्शक परीक्षण अशी या स्पर्धेची वैशिष्ट्य असून स्पर्धेत विजेत्या स्पर्धकास अनुक्रमे प्रथम क्रमांक ₹ १०,००० द्वितीय क्रमांक ₹ ७,००० व तृतीय क्रमांक ₹ ५,००० अशी रोख पारितोषिके व स्मृतीचिन्ह दिली जाणार आहेत. स्पर्धेची माहिती https://forms.gle/Tzjy3MysLBmtc66J9 या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी स्पर्धकांनी संस्थेच्या सहकार्यवाह सीमा कोरगावकर यांच्या ९४२२३८१९७५ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या कार्याध्यक्ष यांनी केले आहे अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स