वसई मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसाद कुलकर्णी.
वसई मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसाद कुलकर्णी.
वसई मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळातर्फे आयोजीत संमेलनाचे १६ वे वर्ष.
कणकवली | ब्यूरो न्यूज : वसई मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळातर्फे १५ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या सोळाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध कवी, गीतकार आणि व्याख्याते प्रसाद कुलकर्णी यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यापूर्वी भारत सासणे, पुष्पा भावे, उत्तम कांबळे, सिसिलिया कार्व्हलो आदी साहित्यिकांना या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.
प्रसाद कुलकर्णी हे लेखक, चित्रपट तथा रंगकर्मी, वक्ता, गायकी व गीत लेखन अशा विविध माध्यमातून चतुरस्तरपणासाठी विशेष परिचीत आहेत.
शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी सेंट जोसेफ हायस्कूल नंदखाल, वसई येथे एक दिवसीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले असून साहित्य रसिकांनी त्याला उपस्थिती लावावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रेमंड मचॅडो यांनी केले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
श्री रामनवमी उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या डामरे - फोंडाघाट येथील रील स्पर्धेचा भव्य बक्षिस वितरण सोहळा उत्साहात.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु अभिवादन सोहळा.
न्हावेली येथील संगीत शिक्षण संस्थेचा १६ ऑगस्...