ताज्या बातम्या
श्री. हरी खोबरेकर व कै. आतु फर्नांडिस मित्रमंडळ, गवंडीवाडा 'गणेश विसर्जन' पथकाच्या वतीने श्री गणेश मूर्ती विसर्जनास सहकार्य. ‘आशीर्वादाचा दिवा’ प्रज्वलित करून सेवा संकल्प दृढ़. माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक.
श्री रामनवमी उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या डामरे - फोंडाघाट येथील रील स्पर्धेचा भव्य बक्षिस वितरण सोहळा उत्साहात.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

श्री रामनवमी उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या डामरे - फोंडाघाट येथील रील स्पर्धेचा भव्य बक्षिस वितरण सोहळा उत्साहात.

श्री रामनवमी उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या डामरे - फोंडाघाट येथील रील स्पर्धेचा भव्य बक्षिस वितरण सोहळा उत्साहात. 

Article image

शिवसेना उपनेते संजय आग्रे, सरपंच सौ. संजना आग्रे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती. 

Article image

ब्यूरो न्यूज : श्री देव पाचोबा मित्रमंडळ डामरे - फोंडाघाट आयोजित श्रीरामनवमी उत्सव २०२६ निमित्त घेण्यात आलेल्या रील स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. न्यू इंग्लिश स्कूल, आर्ट्स, कॉमर्स कॉलेज येथील सभागृहात या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते संजयजी आग्रे, सरपंच सौ. संजना आग्रे यांच्यासह फोंडाघाट कॉलेजचे चेअरमन श्री. राजू पटेल, संचालक श्री. संदेश पटेल, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. पारकर, कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री. नरे, माजी संचालक सुंदर पारकर गुरुजी, ग्राम पंचायत सदस्य पवन भोगले, सेक्रेटरी चंद्रशेखर लिंग्रस, संचालक रंजन नेरुळकर, सोसायटी चेअरमन राजन नानचे, श्री संतोष जोईल, रिल स्टार शुभम देसाई, अवंतिका सावंत, राजू राणे, अजित नाडकर्णी व यामिनी आग्रे आदी मान्यवर उपस्थित होते.            


यावेळी शिवसेना उपनेते संजयजी आग्रे यांनी त्यांच्या मनोगतातून सांगितले की, आजच्या डिजिटल युगात युवकांनी सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून आपल्या कला, कौशल्य आणि संस्कृतीचे प्रदर्शन करणे अत्यंत गरजेचे आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे युवकांना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. श्री. रामनवमीसारख्या पवित्र उत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे समाजात चांगला संदेश जात असून आयोजकांनी घेतलेला हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सर्व विजेत्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक – निखिल नाईक (कणकवली-कलमठ), द्वितीय क्रमांक – सचिन वाघेश्री (कणकवली-कलमठ), तृतीय क्रमांक – सिद्धेश चव्हाण (मालवण)


उत्तेजनार्थ पारितोषिके –

विराज ढवण (फोंडा), निक तांबे (आंब्रड).


विजेत्यांना अनुक्रमे - प्रथम विजेत्याला ₹१५, ५५५/- चषक व प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकाला ₹७, ५५५/- चषक व प्रशस्तीपत्रक व तृतीय क्रमांकाच्या विजेत्याला ₹३, ५५५/- चषक व प्रशस्तीपत्रक 

तर उत्तेजनार्थ (प्रत्येकी) ₹१, ५००/- चषक व प्रशस्तीपत्रक, अशी रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांच्या सहभागाचा गौरव करण्यात आला.


कार्यक्रमाची यशस्वीता व स्पर्धकांच्या उत्तम प्रतिसाद याबद्दल श्री देव पाचोबा मित्रमंडळ आयोजकांकडून विशेष समाधान व्यक्त करण्यात आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स