भरड येथे श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम.
भरड येथे श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे गणेशोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता मालवणचे व कोकणचे ज्येष्ठ कवी श्री. रुजारिओ पिंटो व कोकणातील मान्यवर कवींची काव्यमैफिल संपन्न होत आहे.
२० सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता सवाल - जवाबाची संगीत भजनबारी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये श्रीराम प्रासादिक भजन मंडळ, शिरसे, राजापूर (बुवा संतोष शिरसेकर, पखवाज- अजित शिरसेकर, तबला- सौरभ भोगले) विरुद्ध श्री भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ, वायरी- मालवण (बुवा-भालचंद्र केळुसकर, पखवाज - विशाल केळुसकर, तबला – पंकज पाटील) यांच्यात ही भजनबारी रंगणार आहे. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ९:३० वाजता श्री बोर्डेकर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ दोडामार्ग यांचा नाट्यप्रयोग, २ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता ह.भ.प. नेहा उपाध्ये (म्हापसा, गोवा) यांचे 'गजेंद्रमोक्ष' या विषयावर कीर्तन, ३ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. संदीप मांडके (पुणे) यांचे 'रामभक्त केवट' वर कीर्तन, ४ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. अक्षय घांग्रेकर (भिवंडी) हे 'दूधभात शिक्षा' या विषयांवर कीर्तन सादर करणार आहेत. ५ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. केशव शिवडेकर (कपिलेश्वरी, गोवा) 'जामिनाचा धोंडा' वर कीर्तन, ६ ऑक्टोबर रोजी ह.भ.प. हरिहर नातू (मालवण) हे 'श्रीकृष्ण शिष्टाई' वर कीर्तन सादर करणार आहेत.
९ ऑक्टोबर रोजी श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ५ वाजता भजन, रात्री अमृतनाथ पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, म्हापण यांचा दशावतार होणार आहे. ऑक्टोबर रोजी ढोलताशांच्या गजरात आणि पारंपरिक चलचित्र देखाव्यासहित विसर्जन मिरवणूक निघून श्री गणेशमूर्ती विसर्जन होणार आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
'हर घर तिरंगा प्रमाणेच मनमन तिरंगा' भावना जपत व्यसनांपासून 'नेहमी' दूर रहा : आर. पी. बागवे हायस्कूल संस्था अध्यक्ष उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी.
कर्जाचे आमिष दाखवून ५१ लाख ८१ हजार ५०० रुपयां...