आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत डिगस, तुळसुली प्रशालेतील विद्यार्थ्यांना सायकल वाटप.
आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत डिगस, तुळसुली प्रशालेतील विद्यार्थ्यांना सायकल वाटप.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : नवी मुंबई वाशी येथील शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर व उपशहरप्रमुख महेश परब यांच्या सौजन्याने कुडाळ तालुक्यातील डिगस येथील माध्यमिक विद्यालय व तुळसुली विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची यावेळी उपस्थिती होती.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाहतुकीची व्यवस्था व्हावी, या हेतूने डिगस माध्यमिक विद्यालयातील १०० विद्यार्थ्यांना व तुळसुली विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्रशालेतील १०० विद्यार्थ्यांना हे मोफत सायकल वाटप करण्यात आले आहे अशी माहिती मिळत आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, माजी पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक आदी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
मसुरेत आर. पी. बागवे हायस्कूल प्रशालेत मनसेच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच इनडोअर क्रीडा साहित्याचे वितरण.
मालवण दांडी येथील जि. प. प्राथमिक प्रशालेच्या ...
व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळची मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवातील दमदार कामगिरीची परंपरा कायम.
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा पाठिंबा.