शिवसेना शिवउद्योग संघटनेची बैठक संपन्न.
शिवसेना शिवउद्योग संघटनेची बैठक संपन्न.
कणकवली | ब्यूरो न्यूज : कणकवली शिवसेना शिवउद्योग संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली. शिवउद्योग संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख विश्वास गावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यात, शिव उद्योग संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुका पदांवर नियुक्ती करणे, दिवाळी फराळ संदर्भात छोटे व्यावसायिक, गट यांना बाजारपेठ मिळवून देणे, कोकणी मेव्याला बाजारपेठ मिळवून देणे, प्रत्येक तालुक्यात उद्योग स्टॉल उभारणे, वास्तुलक्ष्मी प्रोजेक्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविणे यांसह विविध विषयांवर चर्चा झाली.
या बैठकीत महिलांची व भगिनींची उपस्थिती होती. यावेळी शिव उद्योग संघटना महिला उपजिल्हाप्रमुख सरिता राऊत, उप तालुकाप्रमुख राजन तोंडवळकर, कणकवली तालुकाप्रमुख दामोदर सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख अरुण तोडणकर, महिला उप तालुकाप्रमुख शिवसेना पूजा तोडणकर, दीक्षा सावंत, आशा वळप्पी, पूजा बांगकर, संजना शेलटे, प्रांजल तळेकर, ज्योती पालेकर, प्रियंका तांबे, स्मिता गुरव, शितल गुरव आदी महिला उपस्थित होत्या.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप नगराध्यक्ष सुशांत नाईक यांना अप्पासाहेब पटवर्धन चौक येथील नगरपंचायतच्या मालकीच्या जागेतील जेष्ठ व्यापारी तसेच व्यावसायिकांची भेट आणि निवेदन.
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष संदेश पारकर व उप...
'आम्ही ज्या दिवशी राजकारणात येऊ त्या दिवशीपासून भले भले गायब होतील...!'
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची सामाजिक कार्यकर्ते तथा कणकवलीचे ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र पेडणेकर व संजय मालंडकर यांनी घेतली भेट.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमीसे यांची सामाजिक क...
नाधवडे - वैभववाडी एमआयडीसीचे पायाभूत विकासकाम तातडीने सुरू करुन एमएसएमई उद्योगांना प्राधान्य द्यावे
नाधवडे - वैभववाडी एमआयडीसीचे पायाभूत विकासका...