ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वृक्ष लागवड विषयक मोहीमेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे सहभागाचे आवाहन.

वृक्ष लागवड विषयक मोहीमेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे सहभागाचे आवाहन.

प्रकाशन: 09 Sep 2025 10:57 AM
वाचन संख्या 97

वृक्ष लागवड विषयक मोहीमेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे सहभागाचे आवाहन.


'हरित महाराष्ट्र -समृद्ध महाराष्ट्र' या अभियानांतर्गत १० कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा जिल्हास्तरीय आढावा.



सिंधुदुर्ग नगरी | ब्यूरो न्यूज : 'हरित महाराष्ट्र -समृद्ध महाराष्ट्र' या अभियानांतर्गत राज्यात १० कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात २ लाखांपेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत काही विभागांनी लक्षणीय कामगिरी केली असून उर्वरित विभाग देखील उद्दिष्टपूर्तीकडे टप्प्याटप्प्याने वाटचाल करत आहेत. जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी 'एक पेड माँ के नाम 2.0' मोहिमे अंतर्गत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी. तसेच लावण्यात आलेल्या रोपांची माहिती प्ले स्टोअरवर उपलब्ध असणाऱ्या अमृत वृक्ष ॲप मध्ये अपलोड करावी. राज्य शासनाचे हे महत्वाकांक्षी अभियान असून जिल्हा प्रशासन आणि नागरिकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ही मोहिम यशस्वी करण्यात येईल असे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले आहे. 

Article image


'हरित महाराष्ट्र - समृद्ध महाराष्ट्र' या अभियानांतर्गत १० कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा जिल्हास्तरीय आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. विभागनिहाय उद्दिष्टे, प्रत्यक्ष लागवड आणि अमृत वृक्ष ॲपवरील नोंदींचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला. या वेळी उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, पत्तन अभियंता वीणा पुजारी, जिल्हा सह आयुक्त विनायक औंधकर, जिल्हा कृषी अधिक्षक भाग्यश्री नाईकनवरे, शिक्षणाधिकारी कविता शिंपी, प्रजापती शामराव थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी आदी उपस्थित होते.  


जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, जिल्ह्यातील विविध विभागांकडून आतापर्यंत दोन लाखापेक्षा जास्त रोपे लावण्यात आली आहेत. उर्वरित विभागांनी देखील प्राधान्याने उद्दिष्ट्य पूर्ती करावी. सर्व विभागांनी ३० सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे व लागवड झालेल्या प्रत्येक रोपाची नोंद अमृत वृक्ष ॲपमध्ये करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी यावेळी दिले.



(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

लोकप्रिय टॅग्स