टोपीवाला हायस्कूलच्या मुलांचे विशेष यश.
टोपीवाला हायस्कूलच्या मुलांचे विशेष यश.
मालवण | ब्यूरो न्यूज : वाडिया कॉलेज, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या अशा, महाराष्ट्र प्रज्ञाशोध (Maharashtra Talent Search Examination) परीक्षेत मालवण मधील टोपीवाला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
यंदा या परीक्षेसाठी शाळेतून ६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. वळंजू सर यांनी विद्यार्थ्यांच्या या कामगिरीची प्रशंसा केली आहे.
या परीक्षेत इयत्ता दहावीतील कु. श्रेयस चंद्रशेखर बर्वे आणि कु. आर्या अजित राणे यांनी विशेष पारितोषिक मिळविले आहे.
कु. हर्ष सुहास पांचाळ आणि कु. आदित्य समीर बर्डे यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली.
कु. साक्षी संजय रावराणे हिने तालुकास्तरीय पारितोषिक प्राप्त केले, तर कु. रोशन कैलास साळुंखे याने जिल्हास्तरीय पारितोषिक मिळवले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री. वळंजू यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो व बातमी सौजन्य | मालवण ब्यूरो
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
समान विभागातील बातम्या
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्...
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास...
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचा ॲथलीट कु. सोहम चव्हाण याची विभागीय स्पर्धेच्या पात्रतेची 'उंच उडी...!'
रोझरी इंग्लिश स्कूल, मालवणच्या मुलींची विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड.
रोझरी इंग्लिश स्कूल, मालवणच्या मुलींची विभाग...