ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्गनगरी, कुडाळ येथे नवीन शासकीय वसतिगृहांना मंजुरी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्गनगरी, कुडाळ येथे नवीन शासकीय वसतिगृहांना मंजुरी.

प्रकाशन: 30 Aug 2025 09:56 PM
वाचन संख्या 283


आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्गनगरी, कुडाळ येथे नवीन शासकीय वसतिगृहांना मंजुरी.


राज्य शासनाचा निर्णय ; मागासवर्गीय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार.


सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या माध्यमातून शासकीय वसतिगृह मंजुर.


मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन सिंधुदुर्गनगरी आणि कुडाळ येथे नवीन शासकीय वसतिगृहे उभारण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. आमदार निलेश राणे यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

Article image


जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना निवास आणि भोजनाच्या सोयी-सुविधांची कमतरता जाणवत होती. यामुळे अनेक हुशार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांनी १३ ऑगस्ट रोजी सामाजिक न्याय मंत्र्यांना पत्र सादर करून या ठिकाणी शासकीय वसतिगृहे सुरू करण्याची विनंती केली होती.


मंत्रालयाने आमदार राणे यांच्या पत्राची दखल घेत ही मागणी योग्य असल्याचे नमूद केले. नव्या वसतिगृहांमुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित निवास, पौष्टिक भोजन, अभ्यासासाठी अनुकूल वातावरण आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध होईल. यामुळे त्यांची शैक्षणिक प्रगती होईल आणि सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल, असे पत्रात म्हटले आहे. या मंजुरीमुळे सिंधुदुर्ग आणि कुडाळ येथील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच सुरुवात होणार आहे असेही मंजुरीच्या पत्रात म्हटले आहे.


(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स