खारेपाटण चेकपोस्ट येथे जिल्ह्यात येणाऱ्या श्री गणेशभक्तांसाठी चहा बिस्किट आणि पाण्याची मोफत सोय.
खारेपाटण चेकपोस्ट येथे जिल्ह्यात येणाऱ्या श्री गणेशभक्तांसाठी चहा बिस्किट आणि पाण्याची मोफत सोय.
खारेपाटण | ब्यूरो न्यूज :
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खरेपाटणातील खारेपाटण चेकपोस्ट येथे, भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उद्योजक सतीश गुरव यांच्या मार्फत, मोफत चहा बिस्कीट व पाणी वितरण करण्यात आले. भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या हस्ते या चहा बिस्कीट व पाणी स्टॉल चे उदघाट्न करण्यात आले. या उपक्रमाबद्दल भारतीय जनता पार्टी व सतीश गुरव यांचे आभार मानण्यात येत असून समाधान व्यक्त होत असल्याची माहिती मिळत आहे.
जिल्ह्यात दाखल होणाऱ्या एस. टी. बसेस तसेच अनेक खाजगी वाहनामधून येणारे मुंबईकर, गणेश भक्त चाकरमानी खारेपाटण येथे थांबून भारतीय जनता पक्ष व सतीश गुरव यांच्यामार्फत ठेवण्यात आलेल्या मोफत चहा बिस्कीट व पाणी याचा आस्वाद घेत तरतरीत होऊन पुढील प्रवासा साठी मार्गस्थ होतं होते अशी माहिती मिळत आहे.
यावेळी खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर, उपसरपंच महेंद्र गुरव, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, माजी जि. प. सदस्य बाळा जठार, तालुका सचिव शक्तिकेंद्र प्रमुख, सुधीर कुबल सामाजिक कार्यकर्ते किरण गुरव, महिला तालुका कार्यकारणी सदस्य उज्वला चिके, शेखर शिंदे, शक्तिकेंद्र प्रमुख-सूर्यकांत भालेकर, शेखर कांबळे, तेजस राऊत, शिवसेना तालुकाध्यक्ष मंगेश गुरव, गुरु शिंदे, सुकांत वरुणकर, आरती गाठे, गणेश लवेकर, प्रवीण लोकरे, मोहन पगारे, नंदकिशोर कोरगावकर आदी भाजपा व महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)