ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
गणेशोत्सवानिमित्त लायन्स क्लब मालवण तर्फे निर्माल्य संकलन.

गणेशोत्सवानिमित्त लायन्स क्लब मालवण तर्फे निर्माल्य संकलन.

प्रकाशन: 26 Aug 2025 09:22 AM
वाचन संख्या 400

गणेशोत्सवानिमित्त लायन्स क्लब मालवण तर्फे निर्माल्य संकलन. 


मालवण | ब्यूरो न्यूज : लायन्स क्लब मालवण तर्फे गणेशोत्सवानिमित्त 'शाडू माती गणेश मूर्तीपूजन आणि निर्माल्य संकलन' हा उपक्रम राबविण्यात येणार असून मालवण बंदर जेटी येथील गणेश विसर्जन स्थळी निर्माल्य कलश ठेवून गणेश भक्तांकडून निर्माल्य संकलन करण्यात येणार आहे, अशी माहिती लायन्स क्लब मालवणच्या अध्यक्षा सौ. अनुष्का चव्हाण यांनी दिली. याबाबत गणेशभक्तांना आवाहन करणारे पत्रक लायन्स क्लब मालवणच्या बैठकीत क्लबचे सदस्य रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आले. 

Article image


मालवण बंदर जेटी किनाऱ्यावर गणेशोत्सवाच्या पाचव्या, सातव्या व अकराव्या दिवशी निर्माल्य कलश ठेवून गणेश मूर्ती विसर्जना सोबत आणलेले निर्माल्य लायन्स क्लबकडून संकलित करण्यात येणार आहे. निर्माल्यामध्ये केवळ हार, पाने, फुले यांचा समावेश असावा, तसेच प्लास्टिक, थर्माकोल, कापडी वस्तू, खाद्य पदार्थ, मूर्ती किंवा त्याचे अवशेष यांचा समावेश नसावा. निर्माल्य समुद्र, नदी किंवा विहिरीत टाकू नये, तसेच शाडू माती नैसर्गिक व पर्यावरण पूरक तसेच पाण्यात विरघळणारी असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी शाडू मातीच्या गणेश मूर्तीचे पूजन करावे, असे आवाहन अनुष्का चव्हाण यांनी केले.


यावेळी अध्यक्षा अनुष्का चव्हाण, सचिव मनाली दळवी, खजिनदार पूनम चव्हाण, लायन्स सदस्य रुजारिओ पिंटो, अवधूत चव्हाण, राजा शंकरदास, उमेश शिरोडकर, उदय घाटवळ, जयश्री हडकर, अंजली आचरेकर, दिक्षा गांवकर, नंदिनी गांवकर, रूपा कांदळगावकर, ऋग्वेदा धामापूरकर आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स