मालवणात ग्रंथपाल संजय शिंदे यांचा नागरी सत्कार संपन्न.
मालवणात ग्रंथपाल संजय शिंदे यांचा नागरी सत्कार संपन्न.
उच्च व तंत्रशिक्षण विभाग व ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार प्राप्तीचे औचित्य.
मालवण | प्रतिनिधी :
उच्च व तंत्रशिक्षण विभाग व ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार श्री. संजय काशिनाथ शिंदे यांना नुकताच प्रदान झाला. यानिमित्त श्री शिवराज मंच, मातृत्व आधार फाऊंडेशन व सहयोगी संस्था, मालवण यांच्या वतीने नागरी सत्कार सोहळा रविवार, २४ ऑगस्ट रोजी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर, सत्कारमूर्ती संजय शिंदे, प्रकाश कुशे, शिवराज मंचचे सर्वेसर्वा भूषण साटम, मातृत्व आधार फाऊंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे व प्रा. डॉ. सुमेधा नाईक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक अरविंद म्हापणकर, मातृत्व आधार फाऊंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे, ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश कुशे, भाऊ सामंत, डॉ. सुमेधा नाईक, सुभाष कुमठेकर, समीर शिंदे, ॲड. पलाश चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व महाविद्यालयीन संस्था पदाधिकारी (कोषाध्यक्ष) नंदू देसाई, संजय शिंदे यांच्या वहिनी प्रवीणा शिंदे आणि वैशाली शंकरदास यांनी अभिनंदनपर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर ग्रंथमित्र श्री. संजय शिंदे यांचा अध्यक्ष अरविंद म्हापणकर व मान्यवर यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मातृत्व आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या १९८८-८९ बॅचच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रकाश कुशे यांनी नाट्यपरिषद व सिंधुदुर्ग परिमलच्या वतीने त्यांचा सत्कार केला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना संजय शिंदे म्हणाले, आजचा सत्कार हा माझा घरचा, कुटुंबातील, मित्रांनी केलेला सत्कार आहे. माझ्या हृदयाच्या कोपऱ्यामध्ये हा दिवस कायमच कोरून ठेवणार आहे. मी पुरस्कारासाठी कधीच काम केले नाही, आपण फक्त शंभर टक्के काम द्यायच. प्रामाणिकपणे काम केले की यश निश्चित मिळते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ रंगकर्मी साहित्यिक अरविंद म्हापणकर यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात श्री. संजय शिंदे यांच्या समाज कृतीशील व्यक्तिमत्वाची प्रशंसा केली.
यावेळी गणेश मेस्त्री, भाऊ सामंत, ॲड. प्रथमेश सामंत, सुभाष कुमठेकर, वैशाली शंकरदास, दादा वेंगुर्लेकर, नंदन देसाई, प्रदीप नाईकसाटम, सुमन कुमठेकर, हिमांशु शिंदे, समीर शिंदे, यशश्री वरक, शुभदा टिकम, सागर रेडकर व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत ॲड. प्रथमेश सामंत व प्रास्ताविक भूषण साटम यांनी केले तर ॲड. पलाश चव्हाण यांनी आभार प्रदर्शन केले.
टॅग्स:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)