मळगांव येथील दहीहंडी उत्सव २०२५ उत्साहात.
वाफोलीच्या माऊली गोविंदा पथकाची बाजी.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भर पावसातही स्पर्धक आणि चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
मळगाव | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ग्रामस्थांच्या सहभागातून आणि भिल्लवाडी गृपच्या संयुक्त उपक्रमातून 'मळगांव दहीहंडी उत्सव २०२५' उत्साहात संपन्न झाला पडला. हा उत्सव अनुभवण्यासाठी, मळगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
उत्सवा दरम्यान जोरदार पाऊस असूनही सहभागी गोविंदा पथके आणि प्रेक्षकांनी उत्सवात उत्साहात सहभाग घेतला.
या दहीहंडी स्पर्धेत, माऊली गोविंदा पथक, वाफोली यांनी कमी वेळेत ६ थर रचत दहीहंडी फोडली आणि विजेतेपद पटकावले. त्यांना ११, १११/_ रुपयांचे बक्षीस देण्यात आले. हे बक्षीस समाजसेवक तथा भिल्लवाडी गृप अध्यक्ष पांडुरंग राऊळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
अंतिम फेरीत सिंहगर्जना संघ, बांदा आणि माऊली गोविंदा पथक, वाफोली यांच्यात चुरस निर्माण झाली. मात्र वेग आणि कौशल्याच्या बळावर माऊली पथकाने बाजी मारली.
कार्यक्रमस्थळी डिजेच्या ठेक्यावर गोविंदांचे नृत्य देखिल आकर्षणाचा विषय ठरले. ढोल - ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने, छत्रपती शिवाजी महाराज चौकात पारंपरिक व सांस्कृतिक उत्साह शिगेला पोहोचला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)