ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
कुडाळात मुंबई विद्यापीठाचा ५८ वा युवा महोत्सव.

कुडाळात मुंबई विद्यापीठाचा ५८ वा युवा महोत्सव.

प्रकाशन: 16 Aug 2025 07:41 PM
वाचन संख्या 314


कुडाळ | ब्यूरो न्यूज : मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग विभागाचा ५८ वा युवा महोत्सव २२ व २३ ऑगस्टला संत राऊळ महाराज कॉलेजमध्ये होत आहे. सिंधुदुर्ग विभाग अंतर्गत ४२ महाविद्यालये या युवा महोत्सवात सहभागी होतील. या युवा महोत्सव अंतर्गत विविध ३९ स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे या महोत्सवाचे प्रमुख डॉ. मंगेश जांबळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.


Article image


मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विभाग अंतर्गत ५८ वा युवा महोत्सव कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय येथे होत आहे. यावेळी कॉलेजच्या प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, डॉ. प्रा. मंगेश जांबळे, प्रा. रवींद्र ठाकूर, प्रा. संतोष वालावलकर, प्रा. मिलिंद तुपेरे, प्रा. सुहास पाटील आदी उपस्थित होते.


यावेळी बोलताना डॉ. प्रा. जांबळे म्हणाले, हा ५८ वा युवा महोत्सव असून या महोत्सवाचे उद्घाटन २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजता कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, सरचिटणीस अनंत वैद्य, सहसचिव महेंद्र गवस, यांच्यासह प्रमुख पाहुणे सांस्कृतिक विभाग मुंबई विद्यापीठ समन्वयक डॉ. निलेश सावे, जिल्हा समन्वयक डॉ. आशिष नाईक, डॉ. नितीन वळंजू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.


डॉ. जांबळे म्हणाले ५८ वा युवा महोत्सव हा आमच्यासाठी सांस्कृतिक महोत्सव आहे. नियोजनाची जबाबदारी संत राऊळ महाराज कॉलेजवर असून या महोत्सवात ४२ महाविद्यालये सहभागी होणार आहेत. २२ ऑगस्ट रोजी विविध स्पर्धांमध्ये पहिल्या दिवशी ३५ स्पर्धा प्रकार होणार आहेत. यामध्ये भारतीय शास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, तालवादन, तंतुवाद्य वादन, इतर वाद्य, पाश्चिमात्य संगीत, भारतीय पारंपरिक नृत्य, लोककला, वाङ्गय विभाग, वक्तृत्व मराठी हिंदी इंग्लिश, वादविवाद स्पर्धा, अभिनय स्पर्धा, कथाकथन स्पर्धा होणार आहेत. थिएटर विभाग अंतर्गत एकांकिका स्पर्धा, नाटुकली, फाइन आर्ट, ऑन दी स्पॉट पेंटिंग, पोस्टर मेकिंग, शिल्पकाम, ऑन दी स्पाॅट व्यंगचित्र, मेंदी डिझाइन, फोटोग्राफी, असे दोन दिवस ३९ स्पर्धा प्रकार होणार आहेत.


२३ ऑगस्ट रोजी प्रश्नमंजुषा व कथा लेखन स्पर्धा होतील. तसेच ऑर्केस्ट्रा आणि कवाली या स्पर्धा थेट मुंबई विद्यापीठात घेतल्या जाणार आहेत. या स्पर्धेसाठी विद्यापीठाकडून मान्यवर परीक्षक परीक्षण करणार आहेत. त्यामध्ये काही सेलिब्रिटी सुद्धा असतील, असे प्रा. जांभळे म्हणाले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स