ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
मळगाव छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचे भिडे गुरुजी यांच्या हस्ते अनावरण.

मळगाव छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचे भिडे गुरुजी यांच्या हस्ते अनावरण.

प्रकाशन: 16 Aug 2025 01:45 PM
वाचन संख्या 533

Article image


ब्यूरो न्यूज : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचे अनावरण श्री. भिडे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. हा ध्वजस्तंभ मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी गृप अध्यक्ष पांडुरंग राऊळ यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मळगाव पंचक्रोशीतील हिंदू बांधव उपस्थित होते.

Article image


अनावरणानंतर परिसरात

'छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय', अशा घोषणा देण्यात आल्या.

Article image


भिडे गुरुजींनी आपल्या भाषणातून छत्रपतींच्या कार्याचा गौरव केला तसेच मार्गदर्शन करताना आवाहन केले की, मळगाव प्रमाणे हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभ प्रत्येक गावात उभारावा आणि हिंदूंनी एकत्र यावे.


कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात ग्रामस्थ, महिला व युवकांच्या उत्स्फूर्त सहभाग होता अशी माहिती मिळत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स