मळगाव दहीहंडी उत्सव २०२५ च्या अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक जाहीर.
मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी गृप यांचे संयुक्त आयोजन.
ब्यूरो न्यूज | सावंतवाडी : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी गृप यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १६ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दहीहंडी उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दुपारी सायं. ३ वाजता सुरू होणाऱ्या या कार्यक्रमात गावातील तसेच परिसरातील नामांकित गोविंदा पथके सहभागी होणार असून,
विजेत्या पथकाला ११,१११/_ रुपये रोख तसेच ५ थरांच्या सलामीसाठी १००१/_,
६ थरांच्या सलामीसाठी २००१/_, ७ थरांच्या सलामीसाठी ३००१/, ८ थरांच्या सलामीसाठी ४००१/_ व इतर आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
गावातील ग्रामस्थांनी तसेच सर्व नागरिकांना उपस्थित राहून या पारंपरिक उत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन मळगाव ग्रामस्थ व भिल्लवाडी गृपचे अध्यक्ष पांडुरंग राऊळ यांनी केले आहे.
सहभागी होणाऱ्या दहीहंडी पथकांनी 9967333100 / 7666565100 / 7066393061 / 8975844989 या क्रमांकावर संपर्क करुन नावनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)