ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
सेवानिवृत्त शिक्षक श्री. वसंतराव गंगाराम परुळेकर यांचे निधन.

सेवानिवृत्त शिक्षक श्री. वसंतराव गंगाराम परुळेकर यांचे निधन.

प्रकाशन: 31 Jul 2021 05:31 PM
वाचन संख्या 66

मालवण : ( वैभव माणगांवकर) ,

येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कुलचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. वसंतराव गंगाराम परुळेकर (वय ९३) यांचे आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मालवण बांगीवाडा येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या श्री. परुळेकर यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

मालवण बांगीवाडा येथील रहिवासी असणारे श्री. वसंतराव परुळेकर यांचा तीन वर्षांपूर्वी मालवणच्या बॅ. नाथ पै सेवांगण येथे त्यांच्या विद्यार्थी वर्गाच्या वतीने नव्वदीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला होता. याच कार्यक्रमात मालवण नगरपालिकेच्या वतीने त्यांचा हृद्यसत्कार करण्यात आला होता. एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून श्री. परुळेकर यांची गणना होत होती. गणित आणि विज्ञान या विषयात त्यांचा हातखंडा होता. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीत विद्यार्थ्यांना गणित शिकविण्याचे काम श्री. परुळेकर यांनी केले. १९८७ मध्ये परुळेकर हे भंडारी हायस्कुल मधून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. सेवानिवृत्तीनंतरही परुळेकर सर हे विद्यार्थ्यांना गणित विषयाचे मार्गदर्शन करत असत.

उच्चशिक्षण घेतलेल्या परुळेकर सर यांनी आपल्या आईच्या शब्दाखातर हवाई दलातील नोकरी नाकारून शिक्षकी पेशा पत्करला. मालवणच्या बॅ. नाथ पै सेवांगणच्या वतीने त्यांना य. बा. चोपडे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

त्यांच्या पश्चात पत्नी, सुना, मुलगी, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स