शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांच्या पाठपुराव्यातून स्ट्रीट लाईट व वीज खांब उभारणी.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील महापुरुष मंदिर रेवतळे तसेच आडारी रोड ब्राम्हणदेव मंदिर मार्गांवर नागरिकांची मागणी असलेली स्ट्रीट लाईट व्यवस्था वीज खांब उभारणी करून पूर्ण करण्यात आली. शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांच्या पाठपुराव्यातून वीज वितरणच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात आले.
दीपक पाटकर नागरिकांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून काम पूर्ण करतात. दरम्यान नागरिकांनी दीपक पाटकर तसेच वीज अधिकारी व कर्मचारी यांचेही आभार मानले.
यावेळी बाबू वायंगणकर, गजा मोरजकर, रामा मोरजकर, पिंटू धुरी, हरी कांबळी, संतोष कुडाळी, मंगेश मांजरेकर, बस्त्याव आल्मेडा, महेश मांजरेकर, प्रदीप मांजरेकर, अमेय मांजरेकर, पिंटू मांजरेकर, मुकेश बावकर, अमेय बादेकर, निनाद बादेकर, ललित चव्हाण, राजा मांजरेकर, मयू पारकर, मुन्ना फाटक, बाळा फाटक, विजय फाटक, मिलिंद फाटक, बाबू वगाड, राजेश बांदेकर, सौगंध बांदेकर, श्रीराज बांदेकर आदी उपस्थित होते.
स्ट्रीट लाईट व वीज खांब प्रश्न नागरिकांनी मांडल्या नंतर वीज वितरणच्या माध्यमातून काम पूर्ण करण्यात आले, असे सांगत दीपक पाटकर यांनी वीज अधिकारी म्हेत्रे, यांसह वीज कर्मचारी तसेच प्रकाश पावसकर व गोवेकर यांचे आभार मानले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)