सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट लावण्याची अंतिम तारीख ३० जून.
ब्यूरो न्यूज : वाहनधारकांसाठी केंद्र सरकारने २०१९ नंतरच्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP Plate) लावणे अनिवार्य केले आहे. यासाठी प्रोसेस सुरु आहे. आतापर्यंत लाखो वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यात आली आहे.
अजूनही अनेक वाहनांना नंबर प्लेट बसवणे बाकी आहे. त्यामुळे ज्यांनी अजूनही नंबर प्लेट बसवली नाही त्यांनी मुदतीपूर्वी बसवून घ्यावी, अन्यथा दंड बसवण्यात येणार आहे.
या निर्णयानंतर अनेकांनी HSRP प्लेट बसवली आहे. परंतु १० टक्के लोकांनी ही प्लेट बसवले नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राज्यात ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची अंतिम तारीख ३० जून २०२५ आहे. २०१९ च्या आधी खरेदी केलेल्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट लावायची आहे.
यासाठी सर्वप्रथम https://bookmyhsrp.com/ या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर राज्य आणि वाहनाचा प्रकार म्हणजे (टू व्हिलर की फोर व्हिलर) हे निवडायचे आहे.
यानंतर गाडीची सर्व माहिती भरायची आहे. यात आरसी नंबर, इंजिन नंबर, चेसिस नंबर ही माहिती असणार आहे. ही माहिती रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये दिलेली असणार आहे.
यानंतर नंबर प्लेटची डिलिव्हरी कुठे हवी आहे त्याचा पत्ता भरा त्यानंतर वेळ आणि तारीख निवडा.
यानंतर ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करायचे आहे. ३०० ते ६०० रुपयांपर्यंत हा चार्ज असणार आहे.
यानंतर हाय सिक्युरीटी नंबर प्लेटची रिसिप्ट मिळेल. त्याचे पीडीएफ किंवा प्रिंट काढून ठेवावी लागेल व जेव्हा नंबर प्लेट लावली जाईल तेव्हा दाखवावे लागेल.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)