ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवण राजकोट येथील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन व दर्शन सोहळा उत्साहात.

मालवण राजकोट येथील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन व दर्शन सोहळा उत्साहात.

प्रकाशन: 12 May 2025 11:10 AM
वाचन संख्या 42

मालवण | ब्यूरो न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मालवण येथील किल्ले राजकोट मधल्या पूर्णाकृती पुतळ्याचे दर्शन व पूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ११ मे रोजी संपन्न झाला. जवळपास ९१ फूट उंची असलेला छत्रपती शिवरायांचा हा पूर्णाकृती पुतळा देशातील सर्वांत उंच पुतळ्यांपैकी एक आहे.

पूजन झाल्यानंतर शिव आरती करण्यात आली. महाराजांच्या जयघोषाने राजकोट परिसर दणाणून गेला. यावेळी शिल्पकार अनिल सुतार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, अधिक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, अजित पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

छत्रपतींच्या पुतळ्या बरोबरच पर्यटकांना, शिवप्रेमींना याची भव्यता पाहता यावी, छत्रपतींच्या कार्याचा अनुभव यावा यासाठी परिसराचा भागही शिवसृष्टी म्हणून विकसित केला जाणार आहे, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, कुडाळ मालवण विधानसभा आमदार निलेश राणे, आमदार कालिदास कोळंबकर, आमदार निरंजन डावखरे, रविंद्र फाटक, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, काका कुडाळकर, शिल्पकार अनिल सुतार, तहसीलदार वर्षा झाल्टे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व शिवभक्त उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स