ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा हीरक महोत्सव समारोप सोहळा २६ एप्रिल रोजी.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा हीरक महोत्सव समारोप सोहळा २६ एप्रिल रोजी.

प्रकाशन: 25 Apr 2025 07:47 AM
वाचन संख्या 159

मालवण : कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ, मालवण संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य ाचा हीरक महोत्सव समारोप सोहळा शनिवार, दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी ाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या समारंभाचे उद्घाटन मा. खासदार नारायणराव राणे, माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. दैनिक तरुण भारतचे संस्थापक, लोकमान्य मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक आणि कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. किरण ठाकूर या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मा. आमदार नितेश राणे, मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री आणि पालकमंत्री, जिल्हा सिंधुदुर्ग, तसेच आमदार डॉ निलेश राणे, आमदार दीपकभाई केसरकर, आमदार ॲड. निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, व उपाध्यक्ष अतुल काळसेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख देवदत्त उर्फ दत्ता सामंत, भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब मुळीक, मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू अजय भामरे, उच्च शिक्षण सहसंचालक पनवेल विजय नारखेडे, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य युवराज लखमराजे भोसले, कमांडर राजीव कुबल, सीएसटेक एआय कंपनीचे सीईओ प्रशांत कामत यांची उपस्थिती लाभणार आहे.

याचबरोबर ’58 महाराष्ट्र बटालियन’ कर्नल दीपक दयाल, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, मालवण तहसीलदार वर्षा झाल्टे, मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

माजी विद्यार्थ्यांसाठी खास आयोजित केलेल्या फनी गेम्स, अस्मिता अंक व छायाचित्रे प्रदर्शन यांचे उद्घाटन सकाळी नऊ वाजता संस्था पदाधिकाऱ्यांच्या हस्ते होणार आहे.

त्यानंतर ाचे १९६५ पासून ते आजतागायतचे सर्व विद्यापीठ प्रतिनिधी UR, जनरल सेक्रेटरी GS, विद्यार्थिनी प्रतिनिधी LR, सेवानिवृत्त प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान सकाळी नऊ ते दहा या वेळेत विशेष सन्मान कक्षामध्ये होणार आहे.

त्यानंतर १० वाजता माननीय खासदार नारायणराव राणे यांच्या हस्ते ात नव्याने तयार करण्यात आलेल्या बास्केटबॉल मैदानाचे उद्घाटन संपन्न होणार आहे. तसेच ाच्या नूतन विस्तारित नामफलकाचे अनावरण डॉक्टर किरण ठाकूर यांच्या शुभहस्ते होणार आहे.

या समारोप सोहळ्यामध्ये ाच्या हीरक महोत्सवी वर्षांमध्ये विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान मुख्य अतिथींच्या हस्ते केला जाणार आहे.

दुपार नंतरच्या सत्रात 3.30 वाजता ाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. माजी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला जाणार आहे. तसेच माजी विद्यार्थ्यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे.

या दिवसभराच्या भव्य कार्यक्रमासाठी “मालवण आणि पंचक्रोशीतील सर्व नागरिक, सर्व आजी माजी विद्यार्थी, हितचिंतक, पालक वर्ग, ाशी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटक, जिल्ह्यातील ांचे प्राचार्य, शाळांचे मुख्याध्यापक, सामाजिक संस्था पदाधिकारी, यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे”असे आवाहन ाचे प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर, हीरक महोत्सव समन्वयक डॉक्टर सुमेधा नाईक, कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे, विकास समितीचे अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर आणि कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स