भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रम निमित्ताने भव्य धम्म रॅली उत्साहात.
मालवण | ब्यूरो न्यूज : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो… महात्मा फुले यांचा विजय असो… छत्रपती शिवाजी महाराज की जय… या आणि अशा घोषणा देत आज मालवणात फुले शाहू आंबेडकर विचारमंच मालवणच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रम निमित्ताने भव्य धम्म रॅली काढण्यात आली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मालवण एसटी स्टॅन्ड मागील समाज मंदिर येथे डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भव्य धम्म रॅली काढण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा चित्ररथ या धम्म रॅलीत सहभागी झाला होता. या रॅलीत भीमगीतांच्या तालावर भीमसैनिकांनी आणि आंबेडकर प्रेमीनी सहभाग घेतला.
यावेळी फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे मिलिंद जाधव, मारुती सोनवडेकर, रंजन तांबे, नेहा तांबे, अजित जाधव, आनंद मालवणकर, राजू कदम, देविदास हारगिले, कैलास राबते, अशोक तांबे, नरेंद्र पेंडूरकर रवींद्र मालवणकर, सुधाकर माणगावकर, किशोर मालवणकर, विकी जाधव, महेश कोळंबकर, संजय जाधव, दत्तात्रय जाधव, सुमित जाधव, आनंद सावळ आदी व इतर उपस्थित होते. मालवण बांगीवाडा येथील समाज मंदिर येथे या धम्म रॅलीची सांगता झाली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)