ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कट्टा येथे २८ रोजी करिअर मार्गदर्शन शिबीर.

कट्टा येथे २८ रोजी करिअर मार्गदर्शन शिबीर.

प्रकाशन: 27 Mar 2025 06:40 PM
वाचन संख्या 81

मसुरे | प्रतिनिधी : संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान पेंडूर, यांच्यातर्फे १० वी ते १२वी च्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मार्गदर्शन शिबीर २८ मार्च रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत माडये हॉल, कट्टा येथे आयोजित करण्यात आले आहे. यात १० वी / १२ वी नंतर पुढील करियर दिशा, आपल्यामधील आवड ओळखून योग्य विषयाची / शाखेची निवड करणे यावर संबंधित विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. सोबतच पोलीस भरती तसेच कला क्षेत्रात आवड असणाऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन देखील असेल. या शिबीराकरिता विद्यार्थ्यांबरोबर एक पालक उपस्थित राहणे अपेक्षित असेल.

यावेळी विश्वनाथ कदम पोलीस भरती विषयी मार्गदर्शन, प्रा. सिद्धेश नेरुरकर उपयोजित कला (Applied Art) आणि ललितकला (Fine Art) यांची ओळख, प्रा. चेतन जगताप CET सामायिक प्रविष्ट प्रक्रियेची ओळख, विलास वखारे प्रमुख वक्ते व करीअर मार्गदर्शक आहेत. हे शिबीर विनामूल्य आहे व याकरिता पूर्वनोंदणी आवश्यक आहे. दशक्रोशीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स