मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रेडिओ क्लब येथील नवीन जेट्टीचे भूमीपूजन.
मुंबई | ब्यूरो न्यूज : बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज दक्षिण मुंबईतील रेडीओ क्लब येथील प्रवासी जेट्टी, टर्मिनल इमारतीचे भूमीपुजन आज करण्यात आले. यावेळी जेट्टी बाबत स्थानिकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसनही केले गेले. गेट वे ऑफ इंडिया येथील अस्तित्वातील जेट्टीवरील सुविधा प्रवाशांकरीता अपुरी पडत असल्याने वृद्ध व्यक्ती, स्त्रीया व लहान मुले यांना अडचणी निर्माण होतात. या प्रस्तावित नवीन जेट्टीमुळे गेट वे ऑफ इंडिया येथील जेट्टीवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. मंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भातील विधानभवनातील आढावा बैठकीत अधिकारी वर्गाला याबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या.
याप्रसंगी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मुख्य अभियंता सुरेंद्र टोपले, वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, अभियंता सुधीर देवरे आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)