ग्रा.पं.विकास आराखड्याबाबत उद्या दि. 27 ऑक्टोबर 2021 रोजी शरद कृषी भवन सिंधुदुर्गनगरी येथे एकदिवशीय प्रशिक्षण..
ओरोस | प्रतिनिधी :राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत जिल्हा, पंचायत समिती, ग्रामपंचायत विकास आराखड्याबाबत उद्या दि. 27 ऑक्टोबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी येथे एकदिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील यांनी दिली. आमचं गांव आमचा विकास या उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शक सूचना व शासन निर्णयाद्वारे निर्गमित केलेल्या पूरक मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन सन http://localhost/news/public/uploads/2022-23 चा वार्षिक विकास आराखडा अंतिम करण्याबाबत सूचना आहेत. हा विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)