मालवणात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा नियोजन बैठक.
उत्साह, हिंदू बांधवांचे सहकार्य व सर्वांच्या एकजूटीतून भव्य दिव्य यात्रेचा संकल्प.
श्री. प्रशांत हिंदळेकर एकमताने स्वागत यात्रा समिती प्रमुख.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मोठ्या उत्साहामध्ये भव्य दिव्य स्वरूपात दरवर्षीप्रमाणे काढण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाचे हे २२ वे वर्ष आहे. यंदाच्या यात्रेचे स्वागत यात्रा प्रमुख म्हणून श्री. प्रशांत हिंदळेकर यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. गुढीपाडवा हिंदू नववर्ष स्वागत यात्रा नियोजन बैठक दत्त मंदिर, भरड मालवण येथे २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी संपन्न झाली.
यावेळी श्री भाऊ सामंत, श्री. विजय केनवडेकर, श्री. अमित खोत, श्री कृष्णा ढोलम, श्री अनिकेत फाटक, श्री रत्नाकर कोळंबकर, श्री श्रीराज बादेकर, श्री. शुभम लुडबे, श्री. हरेश फडते, श्री. अरविंद मयेकर, श्री. दीनानाथ गावडे, श्री. उदय गावडे, श्री. श्रीराम परब यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
प्रतिवर्षी प्रमाणे उत्साह व हिंदू बांधवांच्या सहकार्य व सर्वांच्या एकजुटीतून यात्रा नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. स्वागत यात्रेत सिंधुदुर्गातील स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टिकोनातून त्या धर्तीवर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. ढोल पथक, वेशभूषा स्पर्धा, यांसह मर्दानी खेळ, महिलांच्या फुगडी सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत केले जाणार आहे. मालवणातील विविध सामाजिक संस्था, विविध महिला मंडळे, शाळा, महाविद्यालय यांच्या सहभागातून व त्यांच्या संकल्पनेतून आणखी काही कार्यक्रम आयोजित करण्यात येतील का, याबाबतही त्यांच्याशी संपर्क साधण्यात येणार आहे. पुढील बैठकीत याबाबतचे नियोजन स्पष्ट केले जाणार आहे. यावर्षीची स्वागत यात्रा भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्याबाबत बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले आहे.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रेच्या प्रमुखपदी निवड झालेल्या श्री. प्रशांत हिंदळेकर यांचे अभिनंदन सर्व सदस्यांच्या वतीने करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)