ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
सिंधुरत्न योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफाॅर्मरसाठी ५ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सिंधुरत्न योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील ट्रान्सफाॅर्मरसाठी ५ कोटी ५७ लाखांचा निधी मंजूर.

प्रकाशन: 18 Feb 2025 04:37 PM
वाचन संख्या 96

ब्यूरो न्यूज : सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत कुडाळ व मालवण तालुक्यातील वीज यंत्रणा बळकटीकरणासाठी ५ कोटी ५७ लक्ष एवढा निधी मंजूर झाला आहे. आमदार निलेश राणे यांनी किनारपट्टीवरील विज यंत्रणा सुधारण्यासाठी विशेष लक्ष देत सिंधुरत्न मधून एकूण ३० ट्रान्सफाॅर्मरची मागणी केली होती. त्यानुसार सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी पहिल्या टप्यात कुडाळ तालुक्यातील तीन तर मालवण तालुक्यातील सात अश्या दहा ट्रान्सफार्मरना मंजुरी दिली आहे. यात देवबाग मोबारवाडी ट्रान्सफार्मर, मालवण फोवकांडा पिंपळ येथे 100 kv ट्रान्सफार्मर, सर्जेकोट येथे 100 kv ट्रान्सफार्मर, वायरी भुतनाथ येथे 100 kv ट्रान्सफार्मर, कांदळगाव परबवाडा येथे 100 kv 6 ट्रान्सफार्मर DTC व 11 KV लाइन उभारणे, खैदा घुमडे येथे 100 KVA ट्रान्सफार्मर बसवणे, मालवण बोर्डिंग ग्राउंड येथे 100 KVAट्रान्सफार्मर बसवणे, गवळीवाडी नजीक, कुंभारमाठ येथे २०० KVA ट्रान्सफार्मर बसवणे, रांगणातुळसुली कदमवाडी येथे 100 KVA DTC ट्रान्सफार्मर बसवणे, बाव आंबेडकरनगर येथे 100 KVA DTC ट्रान्सफार्मर उभारणे, आंदुर्ले दाभोलकरवाडी येथे 100 KVA DTC बाव ट्रान्सफर्मर यान ट्रान्सफार्मर उभारणीसाठी मंजुरी मिळाली आहे.

फोटो : सिंधुरत्न समृद्धी योजना बैठक

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स