समाज कल्याणच्या जिल्हा सहाय्यक आयुक्तांनी केले मागसवर्गीय गरजू विद्यार्थी,विद्यार्थींनीच्या वसतिगृह प्रवेशाबाबत आवाहन..!
ओरोस | प्रतिनिधी : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध झालेली आहे. शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश प्रक्रिया इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरु झाले आहेत. मागासवर्गीय मुला, मुलींच्या शासकीय वसतिगृहातील रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश प्रक्रियाबाबत विद्यार्थी, विद्यार्थींनीकडून ऑफलाईन पध्दतीने (मॅन्युअली) अर्जाची नोंदणी करण्यात येत आहे. तरी मागसवर्गीय गरजू विद्यार्थी,विद्यार्थींनीनी वसतिगृह प्रवेश अर्ज विनामूल्य प्राप्त करुन घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत सबंधित वसतिगृहातील गृहपाल,अधिक्षिका व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग दूरध्वनी क्र. ०२३६२२२८८८२ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन दीपक घाटे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग ,सिंधुदुर्ग यांनी केलेले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)