ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव उत्साहात.

अक्कलकोट श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव उत्साहात.

प्रकाशन: 13 Feb 2025 10:06 PM
वाचन संख्या 86

अक्कलकोट | ब्युरो न्यूज : गुरूप्रतिपदे निमित्त अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे गुरुप्रतिपदा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. पहाटे ५ वाजता श्रींची काकड आरती संपन्न झाली. यानंतर स्वामी भक्तांचे वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक झाले. सकाळी ८:३० वाजता चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत पुरोहीत मंदार महाराज व ब्रम्हवृंदांच्या वैदिक मंत्रोच्चारात देवस्थानचे विश्वस्त महेश गोगी यांच्या हस्ते पारंपरिक देवस्थानचे लघुरुद्र करण्यात आले. दुपारी ११ : ३० वाजता श्रींना नैवेद्य आरतीद्वारे महानैवेद्य अर्पण करून भक्त निवास येथे स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आले. याचा लाभ हजारो स्वामी भक्तांनी घेतला.

दिवसभर हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्यासाठी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी व सेवेकरी प्रयत्नशील होते.

सायंकाळी ५ वाजता श्रींच्या सजविलेल्या पालखी सोहळ्याची सुरुवात देवस्थानचे पुजारी मोहन महाराज, मंदार महाराज, व्यंकटेश महाराज यांचे हस्ते आरती करून व देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश इंगळे यांचे हस्ते पालखी पूजन करून वारकरी दिंड्या व बँड पथक व स्वामी नामाच्या जयघोषात पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आले. पालखी मिरवणुक फत्तेसिंह चौक, मेन रोड, कारंजा चौक, समाधी मठ, परतीचा मार्ग कारंजा चौक, मौलाली गल्ली, सुभाष गल्ली, मधला मारुती, भारत गल्ली, देशमुख गल्ली, मार्गे वटवृक्ष मंदिरात रात्री साडे नऊ वाजता पालखी मंदिरात आल्यानंतर गुरु भजन व आरती होवून उपस्थित सर्व भाविकांना मंदिर समितीच्या वतीने शिरा प्रसाद वाटप करण्यात आले. यानंतर गुरूप्रतिपदा उत्सव कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मंदार महाराज पुजारी, महेश इंगळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, संपतराव शिंदे, चंदकांत गवंडी, शशिकांत लिंबीतोटे, प्रदिप हिंडोळे, महादेव तेली, अमर पाटील, प्रसन्न हत्ते, रामचंद्र समाणे, संतोष पराणे, श्रीकांत झिपरे, सागर गोंडाळ, गिरीश पवार, प्रसाद सोनार, महेश काटकर, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, श्रीशैल गवंडी, ऋषिकेश लोणारी, अविनाश क्षीरसागर, संतोष जमगे, लखन सुरवसे, संजय बडवे, मोहन शिंदे, वैभव जाधव, नरसिंग क्षीरसागर, दादा सावंत, दिपक जरिपटके, ज्योती जरिपटके, प्रसाद पाटील , विपूल जाधव, नागनाथ जेऊरे, राजेश निलवाणी, चंद्रकांत डांगे, पोपट भोसले, दिगंबर पाटील, श्रीमंत पांचाळ, अक्षय पांचाळ, नागनाथ गोमदे, आदींसह देवस्थानचे सेवेकरी व अनेक स्वामीभक्त उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 437

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स