ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
करूळ - गगनबावडा घाट रस्ता सुरु करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे घाटस्त्यावर आंदोलन.

करूळ - गगनबावडा घाट रस्ता सुरु करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे घाटस्त्यावर आंदोलन.

प्रकाशन: 18 Jan 2025 07:48 PM
वाचन संख्या 81

घाटरस्त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी लावली तातडीची बैठक.

प्रतिनिधी : वैभववाडी तालुक्यातील करूळ – गगनबावडा घाट रस्ता सुरु करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने करूळ – गगनबावडा घाटात धडक देत जोरदार आंदोलन केले. कोण म्हणतो सुरु होणार नाय सुरु केल्याशिवाय राहणार नाय, भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो, घाटमार्गात एकेरी वाहतूक सुरू झालीच पाहिजे,निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा निषेध असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन छेडण्यात आले. गेली २ वर्षे हा घाट रस्ता बंद आहे. तारीख देऊनही घाट रस्ता सुरु केला जात नाही. आम्ही विरोधासाठी विरोध करत नाही. परंतु पूर्ण रस्ता बंद ठेऊन रस्त्याचे काम करणे हे राज्यातील पहिले उदाहरण आहे. रस्ता बंद करूनही ठेकेदाराकडून अत्यंत धिम्या गतीने काम सुरु आहे आणि झालेले काम देखील निकृष्ट दर्जाचे आहे. पुढील तीन ते चार महिने तरी घाट रस्त्याचे काम पूर्ण होईल असे वाटत नाही त्यामुळे करूळ -गगनबावडा घाटरस्त्यावरून पुढील १० दिवसांच्या आत एकेरी वाहतूक सुरु करावी अन्यथा पुढील आंदोलन हे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर करण्यात येणार आहे असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी दिला. शिवसेना नेत्यांनी घाट रस्त्याची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी तातडीने सोमवारी यासंदर्भात संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले.

वैभववाडी तालुक्यातील करूळ – गगनबावडा घाट रस्ता हा व्यापार उद्योगात वृद्धी करणारा आणि मोठ्या प्रमाणात दळणवळण असलेला महत्वाचा घाटमार्ग आहे. गेली २ वर्षे हा घाट रस्ता बंद आहे. त्यामुळे व्यापारी तसेच नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. हा घाट रस्ता सुरु करण्यासाठी ऑक्टोबर २०२४ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन केले होते. त्यावेळी डिसेंबर २०२४ मध्ये हा घाट रस्ता सुरु करण्याचे लेखी आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता यांनी दिले होते. मात्र अद्याप पर्यंत हा घाट रस्ता सुरु झालेला नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांना निवेदन देऊन १७ जानेवारी २०२५ पर्यंत हा घाटमार्ग सुरु न झाल्यास १८ जानेवारी २०२५ रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार घाट रस्ता सुरु न झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर, युवासेना सचिव स्वप्नील धुरी, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, माधवी दळवी, वैभववाडी येथील मनोज सावंत, यशवंत गवाणकर,शंकर कोकरे, सूर्यकांत परब,लक्ष्मण रावराणे, नितेश शेलार,गणेश पवार,रोहित पावसकर, पांडुरंग पांचाळ, संतोष पाटील, दीपक पवार, संतोष कडू, जयेश पवार, मानसी सावंत, मिलिंद आईर आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स