ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
पोईप गावच्या विद्यार्थ्यांचे ॲबॅकस आणि वैदिक गणित राज्यस्तरीय स्पर्धेत भरीव यश.

पोईप गावच्या विद्यार्थ्यांचे ॲबॅकस आणि वैदिक गणित राज्यस्तरीय स्पर्धेत भरीव यश.

प्रकाशन: 07 Jan 2025 06:12 PM
वाचन संख्या 86

पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील पोईप गावच्या विद्यार्थ्यांनी ॲबॅकस आणि वैदिक गणित राज्यस्तरीय स्पर्धेत भरीव यश संपादन केले आहे. ५ जानेवारी २०२५ रोजी कोल्हापूर येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय गुरूश्री एज्युकेशन ॲकडमी आयोजित ‘ॲबॅकस आणि वैदिक गणित’ स्पर्धेत पोईप गावातील जि. प. केंद्र शाळा नं . १ मधील विद्यार्थीनी कु. हार्दिका राजाराम पाटकर GK3 level च्या स्पर्धेत चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि सायकलची प्रथम मानकरी ठरली. तसेच सौ. इं. द. वर्दम हायस्कूल मधील कु. देवयानी गोपाळ पाचगे या विद्यार्थिनीने GK5 level स्पर्धेत दुसर्‍या क्रमांकाची ट्रॉफी मिळवली. त्यांना गुरुश्री ॲबॅकस ॲकॅडमीचे संस्थापक श्री. अविनाश भिसे सर यांचे मार्गदर्शन लाभले .

याबद्दल पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. अनिल कांदळकर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक श्री. कुंभार सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, केंद्र शाळा पोईपचे मुख्याध्यापक श्री. घाडीगांवकर सर, श्री. पाटील सर, शाळेतील इतर शिक्षक, पंचक्रोशीतील ग्रामस्थ व पालक यांच्याकडून कौतुक होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स