विद्यार्थी घडताना अभ्यासासोबत कौशल्यविकास व सुसंगती हे महत्वाचे घटक.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात मार्गदर्शन.
दत्ता सामंत यांची प्रशालेला पन्नास हजारांची देणगी.
प्रतिनिधी : आजचे विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत. विद्यार्थी घडताना त्यांना शालेय अभ्यासासोबत कौशल्यविकास व सुसंगती हे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. शिक्षण प्रणालीतील सर्वांनी त्या अनुषंगाने काम केले पाहिजे असे मार्गदर्शन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी परुळे येथे केले. विद्याप्रसारक विश्वस्त मंडळ परुळे संचलीत अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे प्रशालेच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्ष स्थानी ते बोलत होते. या वेळी श्री दत्ता सामंत यांनी प्रशालेला ५० हजार रुपयांची देणगी दिली.
प्रशालेच्या वतीने विद्यार्थीनींनी श्री. दत्ता सामंत यांचे औक्षण करुन स्वागत केले व मंचावर त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री. दत्ता सामंत यांच्या हस्ते व मंचावरील मान्यवर व मुख्याध्यापकांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या व मंचावरील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी विद्यार्थीनींना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी मंचावरील मान्यवरांनी मनोगताद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी दत्ता सामंत यांच्यासह मालवण माजी नगरसेवक पाटकर, अविनाश देसाई, डॉक्टर उमाकांत सामंत, सचिन देसाई, अरुणा सामंत, विनायक प्रभू, बी.एस नाईक सर, जया सामंत मॅडम, सरोज देसाई तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रशालेच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)