ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
आम्हाला पुन्हा बेरोजगार होण्यापासून वाचवा..!

आम्हाला पुन्हा बेरोजगार होण्यापासून वाचवा..!

प्रकाशन: 25 Dec 2024 04:57 PM
वाचन संख्या 548

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना युवा कौशल्य प्रशिणार्थी सिंधुदुर्गच्या वतीने निवेदन.

प्रतिनिधी : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनांनवर रुजू असलेल्या प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ व विद्यावेतन यामध्ये वाढ करण्याबाबत युवा कौशल्य प्रशिणार्थी सिंधुदुर्गच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना २५ डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे.

युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी संघटना सिंधुदुर्गच्या सदस्य युवकांनी या निवेदनात म्हणले आहे की, राज्य पातळीवर सुरु असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षण व विद्यावेतन लाभांबद्दल आम्ही आभारी आहोत. सर्व प्रशिक्षणार्थी ग्रामीण व शहरी भागात ऑगस्ट २०२४ व सप्टेंबर २०२४ पासून रुजू आहोत. या अंतर्गत आम्हाला कामाचे प्रशिक्षण व अनुभव दोन्ही मिळत आहे व आम्ही जिद्दिने ते काम करत आहोत. परंतु आता जानेवारी २०२५ व फेब्रुवारी २०२५ मध्ये या योजनेचा कालावधी संपत असून आम्हाला आमच्या त्या पुढील भविष्याची चिंता वाटत आहे. अशा परिस्थितीत योजनेचा सहा महिने हा कालावधी संपल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी अथवा कंत्राटी पद्धतीने आमची भरती व्हावी आणि आम्हाला बेरोजगार होण्यापासून वाचवून रोजगाराची पुन्हा संधी द्यावी अशा मागण्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन आम्ही देत आहोत. त्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस करावी अशी विनंती युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी संघटना सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आली.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी प्रशिक्षणार्थींचे म्हणणे ऐकून घेऊन निवेदन स्विकारले व पुढील कार्यवाहीबद्दल आश्वस्त केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत आणि युवासेना जिल्हा संपर्क प्रमुख मंदार लुडबे, माजी नगरसेवक दीपक पाटकर, योगेश भिसळे, गणेश तोंडवळकर उपस्थित होते.

तसेच निवेदन देण्यासाठी युवा कौशल्य प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने अनिकेत अजय तावडे, निकिता अमोल मयेकर, आदित्य पेडणेकर, मंदार पाटील, तन्वी वस्त, प्राजक्ता वीर, वैष्णवी पाटकर, साक्षी बांदिवडेकर, सूर्यकांत कवटकर, भूषण परब, वैभवी काळसेकर, लतिका मोरे, भाग्यश्री लब्दे, रेणुका सावंत, दिव्या आचरेकर आदि युवक युवती उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स