श्री स्वामी समर्थ मठ, मसदे वडाचापाटचा २४ डिसेंबर रोजी वर्धापनदिन.
मसुरे | प्रतिनिधी : श्री श्री १०८ महंत मठधीश प. पू . सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या
श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास ( रजि.) संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट, मठाचा १३ वा वर्धापन दिन सोहळा २४ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्त सकाळी ८ : ०० वा. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ती वरती आणि पादुकांवर अभिषेक, सकाळी ९ : ०० वा. श्री स्वामी समर्थांची षोडशोपचार पूजाअर्चा, सकाळी ९ : ३० वा. पालखी पूजन, सकाळी १० : ०० वा. अक्कलकोट पादुका पालखी मिरवणुक सोहळा, सकाळी ११ : ०० वा. महाआरती, सकाळी ११ : ३० वा. श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांचे आगमन आणि अध्यात्मिक मार्गदर्शन, दुपारी १२ : ३० वा. श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अर्पण, दुपारी १ : ०० वा. महाप्रसाद, सायं. ५ : ०० वा. सांस्कृतिक कार्यक्रम सुस्वर भजने, सायं. ६ : १५ वा. दिंडी पथक देखावा जय हनुमान प्रासादिक दिंडी भजन मंडळ – मसुरे कावा, रात्रौ. ९:०० श्री वाळवेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली, कुडाळ यांचा ‘अघोरीं विद्या’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. उपस्थितीचे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ मसदे, वडाचापाट यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)