ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा महायुतीकडून भव्य नागरी सत्कार.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांचा महायुतीकडून भव्य नागरी सत्कार.

प्रकाशन: 19 Dec 2024 07:01 PM
वाचन संख्या 97

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांची माहिती.

सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली असून २२ डिसेंबरला ते जिल्ह्यात मंत्री म्हणून प्रथमच दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते व जिल्ह्यातील नागरिकांच्यावतीने त्यांचे भव्य स्वागत व नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, सर्व जिल्हा पदाधिकारी आणि मंडळ अध्यक्ष यांच्या उपस्थितीत नियोजनाची बैठक संपन्न झाली. या नियोजनाच्या बैठकीमध्ये स्वागताचे पूर्ण नियोजन आणि त्यांचा पहिला जिल्हा दौरा कसा असेल याचे नियोजन करण्यात आलेलं आहे.

२२ डिसेंबरला सकाळी मंत्री नितेश राणे यांचे ९ .३० वा. खारेपाटण येथे दाखल झाल्यावर त्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत होईल. तिथे उपस्थित मंडळी आणि त्या विभागातील त्या परिसरातले सर्वजण त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर १०.१५ वाजता तळेरे येथे येऊन पंधरा मिनिटे तरळ्यामध्ये थांबतील. तिथे स्वागत स्वीकारतील. त्यानंतर फणसगांव करून ११.१५ वाजता पडेलला पोहोचतील. त्यांचे स्वागत झाल्यानंतर १२ वा. वाजता मंत्री राणे देवगडला येतील. तिथे त्यांचे जंगी स्वागत होईल. १२.४५ वा तळेबाजारला स्वागत होईल. दुपारी १.१५ वाजता शिरगावला स्वागत होईल.दुपारी १.४५ मिनिटांनी नांदगाव करून दु २.३० वा भारतीय जनता पार्टीच्या सिंधुदुर्गनगरी येथील वसंतस्मृती येथील जिल्हा कार्यालयामध्ये दाखल होतील. तत्पूर्वी जिल्हा मुख्यालय ओरोस फाटा येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालयाच्या वतीने त्या ठिकाणी त्यांचा सत्कार होईल. त्यानंतर ३ वाजता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये ते भेट देतील. जिल्हा बँकेचे ते विद्यमान संचालकही आहेत आणि जिल्हा बँकेच्या दृष्टीने सुद्धा आपल्यातील एक संचालक राज्याचा कॅबिनेट मंत्री झाल्याचा आनंद आहे. जिल्हा बँकेमध्ये त्यांचे स्वागत झाल्यानंतर ते बांदाकडे रवाना होतील. ४ वाजता बांदा नंतर ४.४५ वाजता दोडामार्ग येथे भव्य दिव्य असं स्वागत होईल आणि मंत्री राणे कणकवलीकडे रवाना होतील. सायंकाळी ७ ते ९ दरम्यान कणकवलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्री राणे यांचा नागरी सत्कार संपन्न होईल. भारतीय जनता पार्टी कार्यालयाच्या समोरच्या पटांगणात हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सगळ्यांच्या भेटीगाठी होतील आणि नंतर ते काही इतर कार्यक्रमाना उपस्थित राहतील, असे सावंत आणि दळवी यांनी सांगितले.

सगळेजण मंत्री नितेश राणे व भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारी मंडळी आहेत. या सगळ्यांनी या वेळेप्रमाणे आपल्याला शक्य असेल त्या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे आणि संध्याकाळी सात वाजता जो नागरी सत्कार कणकवलीत आयोजित केलेला आहे त्यालासुद्धा मोठ्या संख्येने सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे. आवाहन करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स