चिवला बीच जवळील वीजेचा धोकादायक खांब बदलला.
माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या पाठपुरावा आणि वीज मंडळाची कार्यवाही.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील चिवला बीच जवळील DH 11/8 वीजेचा जीर्ण धोकादायक खांब वीज वितरण मंडळाच्या वतीने बदलण्यात आला. धोकादायक अवस्थेतील हा खांब स्थानिक व पर्यटकांसाठी समस्या ठरू शकत होता. सध्या पर्यटनाचा मोसम आहे हे लक्षात घेऊन या समस्येवर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे होते त्यानुसार ही कार्यवाही युद्ध पातळीवर करणे आवश्यक होते. ही बाब स्थानिकांनी माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या निदर्शनास येताच त्यानी तातडीने वीज वितरण अधिकारी वर्गाशी चर्चा केली आणि हा खांब बदलण्यात आला अशी माहिती माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी दिली आहे. या बद्दल नागरीकांनी समाधान व्यक्त करुन आभार मानले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)