ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचा वाढदिवस अक्कलकोट येथे साजरा.

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांचा वाढदिवस अक्कलकोट येथे साजरा.

प्रकाशन: 13 Dec 2024 01:39 PM
वाचन संख्या 157

मालवण | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशोक सावंत यांचा ६१ वा वाढदिवस सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र अक्कलकोट येथे नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने श्री. सावंत यांनी कुटुंब आणि मित्रपरिवारासह श्री क्षेत्र आदमापूर, नृसिंहवाडी, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर येथे श्रींचे दर्शन घेतले.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत हे दरवर्षी आपला वाढदिवस आपले कुटुंब आणि कौटुंबिक मित्रपरिवाराच्या सोबतीने अक्कलकोट आणि परिसरातील मंदिरांचे दर्शन घेऊन साजरा करतात. यावर्षी ९ डिसेंबर रोजी होत असलेल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी रविवारी श्री क्षेत्र आदमापूरला जाऊन बाळूमामांचे दर्शन घेतले. तर यानंतर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे श्री दत्तगुरूंचे दर्शन घेण्यात आले. तर सोमवारी ९ डिसेंबरला पहाटे अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर याठिकाणी स्वामींच्या सानिध्यात केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानंतर वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. दुपारी गाणगापूर येथे जाऊन दत्तगुरूंचे दर्शन घेण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत सौ. सावंत, त्यांचे बंधू संतोष सावंत, सौ. सावंत, उद्योजक सत्यवान चव्हाण, सौ. चव्हाण, हॉटेल व्यावसायिक तथा छायाचित्रकार समीर म्हाडगुत, पत्रकार कुणाल मांजरेकर, कृष्णा ढोलम, प्रशांत हिंदळेकर, समीर वजराटकर, रवी टेंबुलकर, महेश वाईरकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 87
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 437

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स