ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आचरा येथे सायबर गुन्ह्यांबाबत पथनाट्यातून जागृती.

आचरा येथे सायबर गुन्ह्यांबाबत पथनाट्यातून जागृती.

प्रकाशन: 13 Dec 2024 12:02 PM
वाचन संख्या 53

आचरा | प्रतिनिधी : वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती व्हावी, याबाबत कोणती सावधगिरी बाळगावी , डायल११२ बाबत माहिती देत त्याचा उद्देश स्पष्ट करत आचरा पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी आचरा तिठा येथे पथनाट्यातून जनजागृती केली. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायबर, अंमली पदार्थ जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.



गुरुवारी आचरा येथे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा पोलीस स्टेशन हद्दीतील गावांमध्ये शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना यांच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती केली जात आहे. संकटकाळी डायल ११२ कार्यप्रणालीचा वापर करुन पोलीस मदत मागून घेण्याचे आवाहन केले. यावेळी आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विशाल चोरगे, पोलीस कर्मचारी सौ मिनाक्षी देसाई, मिलिंद परब, मनोज पुजारे, सौ आचरेकर, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे, शिक्षिका भावना मुणगेकर यांसह विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 277

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स