ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मातृत्व आधार फाऊंडेशनला सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान.

मातृत्व आधार फाऊंडेशनला सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान.

प्रकाशन: 03 Dec 2024 10:29 PM
वाचन संख्या 70

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने आज ३ डिसेंबर रोजी मालवण मधील मातृत्व आधार फाऊंडेशन संस्थेला सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या सहा वर्षांत इतर क्षेत्राबरोबरच अपंग बांधवांना सरकारी विविध योजनेचा लाभ, त्यांची सरकार दरबारी नोंदणी करणे शिवाय शासनाच्या विविध उपक्रमात अपंग बांधवांना विशेष सहकार्य केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. मातृत्व आधार फाऊंडेशनच्या वतीने संस्थेचे संस्थापक संतोष लुडबे व पदाधिकारी दादा वेंगुर्लेकर यांनी हा पुरस्कार स्विकारला.

३ डिसेंबर अपंग दिनाचे औचित्य साधून डिसेंबर रोजी कसाल येथे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, जिल्हा पुनर्वसन विभाग यांच्या वतीने सिध्दीविनायक हॉल कसाल येथे आयोजीत कार्यक्रमात ह्या पुस्तकार वितरीत करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी सन्माननीय श्री अनिल पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. ठाकूर, कुडाळ बी डी ओ श्री. श्याम चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष अनिल शिंगाडे साहेब आणि इतर शासकीय अधिकारी, संस्था चालक उपस्थित होते.

या सन्मानाबद्दल मातृत्व आधार फाऊंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे व दादा वेंगुर्लेकर यांनी हा पुरस्कार हा मातृत्वाच्या सर्व हितचिंतक , सदस्य, पदाधिकारी यांना आम्ही समर्पित केला. मातृत्व आधार फाऊंडेशनच्या माध्यमातून निःस्वार्थी समाजसेवा सुरुच राहिल असे त्यांनी प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे व आयोजक उपस्थितांचे त्यांनी आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 298

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स