ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वेरली येथील श्री देवी सातेरी देव पंचायतन २ डिसेंबर पासून देवस्थळांच्या भेटीला.

वेरली येथील श्री देवी सातेरी देव पंचायतन २ डिसेंबर पासून देवस्थळांच्या भेटीला.

प्रकाशन: 01 Dec 2024 07:51 PM
वाचन संख्या 576

पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वेरली येथे जागृत देवस्थान श्रीदेवी सातेरी आणि इतर देव पंचायतन सोमवार दिनांक २ डिसेंबर पासून गावातील देवस्थानांच्या भेटीला जाऊन सीमोल्लंघन सोहळा होणार आहे. यानिमित्त सोमवार दिनांक २ डिसेंबर रोजी श्रीदेवी सातेरी मंदिरात विविध धार्मिक विधी नंतर श्री सातेरी पंचायतन देव तरंगांसह श्री देव गांगेश्वराच्या भेटीला जाणार असून गांगेश्वर देवस्थानात रात्री निवास करणार आहेत व गांगेश्वर मंदिरा ठिकाणी स्थानिक भजनांचा कार्यक्रम होणार आहे. मंगळवार दिनांक ३ डिसेंबर रोजी श्री देव गांगेश्वर मंदिर येथे महाप्रसाद होणार असून त्यानंतर श्री देवी सातेरी पंचायतन श्री देव रवळनाथ देवालय (चव्हाटा राई) येथे जाणार असून त्या ठिकाणी मुक्कामी राहणार आहेत. श्री देव रवळनाथ देवालय येथे यानिमित्त रात्रौ श्री बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळ कवठी यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.  त्यानंतर दिनांक ४ डिसेंबर रोजी श्री देव रवळनाथ देवालय येथे महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर सायंकाळी श्री देवी सातेरी पंचायतन मुणगेकरवाडी  वाडी येथील विठ्ठलादेवी देवस्थान येथे भेटीला येणार असून विठ्ठलादेवी येथे मुक्कामी राहणार आहेत यावेळी रात्रौ विठ्ठलादेवी चाळा येथे भाविकांचे नवस बोलणे फेडणे आदि कार्यक्रम होणार आहेत. गणगुरुवार दिनांक ५ डिसेंबर रोजी विठ्ठलादेवी देवस्थान येथे दुपारी महाप्रसाद होणार आहे त्यानंतर श्रीदेवी सातेरी पंचायतन देवतरंगांसह सातेरी देवी मंदिरात जाणार असून त्या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत. 

शुक्रवार दिनांक ६ डिसेंबर रोजी श्रीदेवी सातेरी मंदिरात महाप्रसाद होणार असून सायंकाळ नंतर पाच दिवसांच्या देव परिक्रमा भेट सोहळ्याची विधिवत सांगता होणार आहे.मागील कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रथमच हा सोहळा वेरली गावात होणार असल्याने वेरली गावातील मुंबई निवासी ग्रामस्थ मुंबई निवासी माहेरवासीनी पाहुणे आप्तेष्ट मोठ्या प्रमाणात वेरली गावात दाखल झालेले आहेत तरी सर्व भाविकांनी या संपूर्ण सोहळ्याचा उपस्थित राहून लाभ घेण्याचे आवाहन वेरली गावातील ग्रामस्थांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स