ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
शालेय पटांगणातून अवकाश दर्शन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

शालेय पटांगणातून अवकाश दर्शन.

प्रकाशन: 30 Nov 2024 07:32 PM
वाचन संख्या 100

आचरा हायस्कूल येथे सेवा साधना प्रतिष्ठान केतकी चिपळूण यांचा विशेष उपक्रम.

आचरा | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील आचरा हायस्कूलच्या मैदानावर सायंकाळच्या वेळी टेलिस्कोपच्या सहाय्याने आकाशातील ग्रहगोल, तारे, आकाशगंगांचे निरीक्षण करत मुलांनी आकाश दर्शनाचा अनुभव घेतला. चिपळूण येथील सेवा साधना प्रतिष्ठान तर्फे सामाजिक भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत अवांतर ज्ञान मिळावे या उद्देशाने सेवासाधना प्रतिष्ठान चिपळूण कार्यरत आहे.

आचरा येथे दी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल आचरा व कनिष्ठ महाविद्यालय आचरा या प्रशालेत सेवा साधना प्रतिष्ठान केतकी चिपळूण मार्फत पर्यावरण, विज्ञान, इतिहास, योग, आकाशदर्शन इत्यादी विषयांबाबत तीन दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यशाळेत विज्ञान गाथा अद्भुत प्रवास, सह्याद्री पर्वतरांगा, माहितीपट, आहार ऑइल पॉल्युशन ,जीवसृष्टीची उत्क्रांती, अंधश्रद्धा खडक व जीवाश्म प्रदर्शन तसेच आकाशदर्शन याबाबत सेवा साधना प्रतिष्ठान केतकी चिपळूण या संस्थेचे संस्थापक नागेश नांगी सेक्रेटरी विनीत वाघे ,सौ लिना नांगी, श्रुती घाग, शुभम लिबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुंबई समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप परब मिराशी यांच्या प्रेरणेने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत शालेय शिक्षण समिती सदस्य अर्जुन बापर्डेकर, मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटुकडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

या उपक्रमानंतर प्रशालेच्या पटांगणातून खगोल घटकांना जवळून अनुभवणे ही पर्वणी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स