पोईप येथे महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ.
पोईप | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील माळगाव येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना आपल्या गावातून मोठे मताधिक्य मिळावे व यांचा विजय मोठ्या मताधिक्याने व्हावा यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी माळगाव येथील महायुतीचे सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन गावातील श्री. देवी सातेरी, भावई, रवळनाथ, ब्राह्मण देवाचे नामस्मरण करून सर्वानी निर्धार केला व प्रचाराचा शुभारंभाचे श्रीफळ फोडले. यावेळी शक्ती केंद्र प्रमुख निलेश खोत, बुथ प्रमुख आनंद शेलार, युवा कार्यकर्ते सुधीर परब, सिध्देश खोत, उमेश न्हिवेकर, मेघश्याम परब, हरी चव्हाण, मनोज चव्हाण, दत्ता सावंत, कृष्णा जाधव, विलास शेलार, रुपेश कदम, विश्वनाथ भोगले, गुरुदास परब, रामदास परब, सुरेश परब, सुरज धामापूरकर, हेमंत नाईक आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)