ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
तारकर्ली मधील युवकांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हाती घेतली मशाल.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

तारकर्ली मधील युवकांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हाती घेतली मशाल.

प्रकाशन: 14 Nov 2024 04:13 PM
वाचन संख्या 194

पारंपारिक मच्छीमारांच्या विरोधात असणारे राणे नकोच :
प्रवेशकर्त्यांची प्रतिक्रिया.

प्रवेशासाठी संदीप लाड यांचे प्रयत्न.

मालवण : तालुक्यातील तारकर्ली मधील युवकांनी आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन संदीप लाड यांच्या माध्यमातून मंगळवारी माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात त्यांचे स्वागत केले आहे.

यावेळी बोलताना प्रवेशकर्ते म्हणाले पारंपारिक मच्छीमारांच्या विरोधात असणारे राणे नकोच म्हणून आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले पर्ससीननेट आणि एलईडीद्वारे केल्या जाणाऱ्या अनधिकृत मच्छीमारीविरोधात सुरु असलेल्या पारंपरिक मच्छीमारांच्या लढयात आमदार वैभव नाईक हे पारंपरिक मच्छीमारांच्या नेहमी खंबीरपणे पाठीशी राहिले आहेत. आमदार झाल्यापासून सातत्याने प्रत्येक अधिवेशनात पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न ते मांडत आहेत. अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या बोटींवर कारवाईसाठी स्वतः समुद्रात उतरून पारंपरिक मच्छिमारांच्या लढ्याला त्यांनी बळ देण्याचे काम केले त्यामुळे मच्छिमार समाजा देखील वैभव नाईक यांच्या पाठीशी राहणार आहे. याउलट विरोधी उमेदवाराच्या पक्षातील लोकांचेच पर्ससीन आणि एलईडी ट्रॉलर्स आहेत. त्यामुळे अनधिकृत मासेमारी राजेरोसपणे केली जाते त्याला आळा घालण्यासाठी आपण सर्व युवकांनी आमदारांनी वैभव नाईक यांचे नेतृत्व स्वीकारून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवेश केला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर म्हणाले मालवण किनारपट्टीवर सागरी पर्यटन क्षेत्रात अनेक समस्या आहेत.त्या समस्या दुर करण्यासाठी पर्यटन व्यवसाईकांच्या खंबीरपणे पाठीशी राहण्याचे काम आ.वैभव नाईक सातत्याने करतात व पर्यटन व्यवसायिकांचे प्रश्न जाणून घेऊन त्या प्रश्नांना न्याय मिळवून देतात. एक हक्काचे आमदार म्हणून किनारपट्टी भागातील जनतेने आमदार वैभव नाईक यांच्या सोबत राहण्याचे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले आहे.

यावेळी अमित केळुसकर, निलेश केळुसकर, विनीत कांदळगावकर, वैभव वळवडकर,अनिकेत केळुसकर, भानुदास केळुसकर,वीरेंद्र देऊलकर, बबन बांदेकर,राजेश केरकर, गुणांक जुवाटकर या युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर,हरिश्चंद्र केळुसकर, भगवान लुडबे,उपसरपंच दिगंबर मालंडकर, विभाग प्रमुख प्रवीण लुडबे, उपविभाग समन्वयक राजू मेस्त्री, विनोद सांडव,वैष्णवी मेस्त्री, बाबा टीकम, संदीप पवार, प्रिया भोवर, भानुदास केळुसकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 447

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स