मालवणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आगमन व भाषण सुरु....
मालवण | प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मालवणच्या टोपीवाला हायस्कूल मैदान येथे, आमदार वैभव यांच्या प्रचारार्थ आगमन झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी मंचावर आमदार वैभव नाईक, शिवसेना सचिव व माजी खासदार विनायक राऊत, उपनेते गोरीशंकर खोत, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, माजी आमदार परशुराम उर्फ जिजी उपरकर, जिल्हा प्रवक्त्ते मंदार केणी, सतिश सावंत, अमित सावंत, व्हिक्टर डांटस, काॅन्ग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख़ तसेच शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, माजी नगरसेवक नितीन वाळके , माजी नगरसेवक यतीन खोत, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार ओरसकर, उमेश मांजरेकर, पूनम चव्हाण, शिल्पा खोत, जेम्स फर्नांडिस, श्रीकृष्ण तळावडेकर, मुकादम तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मविआ पदाधिकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)