ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
सुकळवाड पाताडे वाडितील आमच्या मंदिराचा घाणेरड्या राजकारणासाठी वापर करु नये : अजिंक्य पाताडे.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

सुकळवाड पाताडे वाडितील आमच्या मंदिराचा घाणेरड्या राजकारणासाठी वापर करु नये : अजिंक्य पाताडे.

प्रकाशन: 09 Nov 2024 08:33 PM
वाचन संख्या 362

सुकळवाड पाताडेवाडी मधील मंदिर हे सर्व देणगीदार, वर्गणीदार आणि सर्वपक्षीय दानशूर लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून मंदिर उभे राहिले असल्याची माजी पं. स. सभापती अजिंक्य पाताडे यांची माहिती.

मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुका पंचायत समितीचे माझी सभापती व भाजपाचे पदाधिकारी श्री. अजिंक्य पाताडे यांनी सुकळवाड पाताडेवाडी येथील श्री देवी भवानी मंदिर हे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी तसेच वर्गणीदार, देणगीदार, मुंबईस्थित बांधव यांच्या सर्वांच्या मेहनतीने उभारत आहे तरी एखाद्या शासकीय निधीमुळेच हे मंदिर उभे राहत असल्याचे दाखवून कुणीही अपप्रचार करू नये असे एका प्रसिद्धी पत्राद्वारे सांगितले आहे. मुळात या मंदिरासाठी खासदार नारायण राणे साहेब यांनी सुद्धा १० लाख रुपयांचे पत्र मंजूर केले आहे तरी सुद्धा वैभव नाईक यांचे बगलबच्चे हे मंदिर जणू आमदार वैभव नाईक यांनीच पूर्ण केल्याप्रमाणे अपप्रचार करत आहेत असा आरोपही त्यांनी केला आहे

अजिंक्य पाताडे प्रसिद्धी पत्रात पुढे म्हणतात, की मंदिर उभारणी बाबत असा अपप्रचार करणे हा संपूर्ण समाजाचा आणि प्रामाणिक काम केलेल्या वर्गणीदार, देणगीदार या सर्वांचा अपमान आहे. खासदार नारायण राणे साहेबांनी यापूर्वी आपल्या खिशातून पंचवीस वर्षांपूर्वी २५,००० /- रोख रक्कम दिली होती तसेच सहा महिन्यापूर्वी निलेश राणे यांनी स्वखिशातून १ लाख रुपये दिले आहेत आणि तसेच भाजप चे आनंद उर्फ भाई सावंत यांनी ५०,०००/- रुपये दिले असल्याचे अजिंक्य पाताडे यांनी सांगितले आहे. पाताडे वाडीतील प्रत्येक सच्च्या कार्यकर्त्याने मेहनत घेऊन देणगी रात्रंदिवस अंगमेहनत करून मंदिर उभे केले असून वैभव नाईक आणि त्यांची कंपनी जणू हे मंदिर आपणच केले असल्याचा दिंडोरा पिटत आहेत असे सांगत त्यांनी सर्वांना विनंती केली आहे की कृपया आमच्या वाडीतील मंदिराचा तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणीही वापर करू नये. परंतु हे असेच चालू राहिल्यास मंदिर कुणामुळे थांबले होते आणि आडकाठी कोण आणत होत तसेच मधल्या कालावधीत काय झालं याचीही इत्यंभूत बातमी केली जाईल असा इशारा माजी पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे यांनी दिला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स