मालवणात उद्या भाजपा तालुका कार्यकर्ता मेळावा.
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुका भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा मंगळवार ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता जानकी मंगल कार्यालय कुंभारमाठ येथे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. हा मेळावा महायुतीचे उमेदवार माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित करण्यात आला आहे.
भाजपाच्या तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर आणि शहर अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)