ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
साळगाव मधील मनसेचे पिंगुळी विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल.

साळगाव मधील मनसेचे पिंगुळी विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल.

प्रकाशन: 03 Nov 2024 03:37 PM
वाचन संख्या 34

आमदार वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन पक्षप्रवेश ; प्रवेशकर्त्यांनी दिली प्रतिक्रिया.

कुडाळ | ब्यूरो न्यूज : कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील मनसे चे विभागप्रमुख सुरज घाटकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आ.वैभव नाईक यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रभावित होऊन आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे. आ. वैभव नाईक यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले आहे. यावेळी बोलताना सुरज घाटकर म्हणाले आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होवुन आपण प्रवेश करत असून आमदार वैभव नाईक यांच्या विजयात आम्ही मोलाचा वाटा उचलू असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार वैभव नाईक त्यांचे स्वागत करताना म्हणाले आपण घेतलेला निर्णय किती योग्य आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल,आपण टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू असे यावेळी सांगितले.

यावेळी रवींद्र तळेकर,विठ्ठल गावडे, बाबू घाटकर, महेश गावडे, अनिकेत गायचोर या मनसेच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, राजू कविटकर, अनुप नाईक, गुरू सडवेलकर, सचिन ठाकूर, बंड्या कोरगांवकर, रोहित सावंत, दत्ताराम लाड, नामदेव तावडे, तृप्ती सावंत, सिद्धी मेस्त्री, तेजस्विनी सावंत, बाबाजी सावंत, मानसी धुरी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स