मेघनाद धुरी यांच्याकडे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्षपद.
मालवण | प्रतिनिधी : राष्ट्रीय काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांची काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रीय काँग्रेसचे मालवण तालुकाध्यक्ष म्हणून मेघनाद धुरी यांनी प्रभावशाली काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना बढती देत राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)